कुडाळ /-

कुडाळमधील व्यापारी वर्गाला आपली दुकाने बंद करण्यासाठी दबाव आणू नका व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करा असे आज कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायत चे मुख्याधिकारी गाढवे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे.आणि यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहिर केलेले आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे असे जिल्हा प्रशासनाचे स्थानीक प्रशासनाला आदेश दिले आहेत.व्यापारी वर्ग शासनाचे नियम पाळून प्रामाणिक पणे व्यवसाय करत आहेत.व यापुढेही करतील. व्यापारी वर्गात लॉकडाऊन बाबत तिव्र नाराजी आहे.उदरनिर्वाह करायचा कसा?,कुटुंब चालवयाचे कसे? लाईट बिल,जागा भाडे भरायचे कसे? असे अनेक समस्यांना व्यापारी वर्ग सध्या तोंड देत आहे.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापुर्वीच जाहिर केलेल्या निर्णयानुसार आज सोमवार पासुन सर्व दुकाने,खुली करण्यात येणार असून सर्व व्यापारी बांधवांन बरोबर आम्ही आहोत.असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले.यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह ,उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, नगरसेवक विनायक राणे ,संध्या तेरसे ,अनंत धडाम ,राकेश कांदे ,सुनील बांदेकर ,साक्षी सावंत ,उषा आठले ,अश्विनी गावडे ,सरोज परब. नगरसेवक निवेदन देते वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page