कट्टा ग्रामीण रुग्णालयात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन..
वराड येथील विकास कामांची भूमिपूजने..
मालवण /-
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे शासनाच्या माध्यमातून मोफत कोविड१९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून याचे उदघाटन आज आमदार वैभव नाईक व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्याचबरोबर वराड येथील विकास कामांची भूमिपूजने करण्यात आली. यावेळी व्हिक्टर डान्टस यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
कट्टा पंचक्रोशीतील नागरिकांना कोविड लसीकरणासाठी गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. याबाबत व्हिक्टर डान्टस व कट्टा येथील शिवसैनिक व नागरिकांनी कट्टा ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. आ. वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत व शासनाकडे पाठपुरावा करून हे कोविड लसीकरण केंद्र सुरु करून घेतले आहे. यामुळे ग्रामस्थांना आता सोयीचे झाले आहे. याबद्दल आ. वैभव नाईक, व्हिक्टर डान्टस यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर व्हिक्टर डान्टस यांच्या मागणीनुसार पालकमंत्री उदय सामंत व आ.वैभव नाईक यांनी वराड विठ्ठल मंदिर ते कट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, व वराड डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाळ महाभोज, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, तसेच अवधूत मालणकर,श्वेता सावंत, वैष्णवी लाड, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगूत, डॉ.सावंत, शेखर रेवडेकर, विष्णू लाड, प्रसाद दळवी, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे,कट्टा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा कुंभारवाड वराड येथे अशोक परब, किशोर भगत पांडुरंग वराडकर, सहदेव मसुरकर, विकास वराडकर, योगेश वराडकर, राजेंद्र वराडकर, जगदीश परब आदी उपस्थित होते.