कुडाळ /-
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आणि पूर्ण प्राथमिक शाळा बुडक्याचीवाडीच्या (तुळसुली, कुडाळ) सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बुडक्याचीवाडी ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बुडक्याचीवाडी व परिसरातील एकूण ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शहराच्या ठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम होत असतात, मात्र ग्रामीण भागात रक्तदाना सारखा कार्यक्रम आयोजित करून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवत, शिबीर यशस्वी करून दाखवल्याने बुडक्याचीवाडी ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रक्तदान शिबीराचे उदघाटन सुदेश मेस्त्री यांच्या हस्ते झाले.यावेळी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, सरपंच नागेश आईर,एसएसपीएम हॉस्पिटल रक्तपेढीचे डॉ.बामणे ,
आरोग्यसेवक गावडे आणि वाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.