सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी देवगडचे जेष्ठ व्यापारी आणि महासंघाचे सक्रिय पदाधिकारी प्रसाद पारकर यांची तर कार्यवाह म्हणून जिल्हा महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके यांची एकमताने निवड करण्यात आली.जिल्हा व्यापारी महासंघाची त्रैवार्षिक निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील गजानन फार्म हाऊसमध्ये मावळते अध्यक्ष नितीन तायशेटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत ही निवड करण्यात आली.सकाळच्या पहिल्या सत्रात जिल्हा कार्यकारिणी निवड व जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या हिताच्या अनेक मुद्द्यावरती या सभेत चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर कोरोना संसार्गाची काळजी घेऊन व्यापार कसा करता येईल याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.

दुपार नंतरच्या सत्रात नुतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रसाद पारकर (देवगड),कार्यवाह -नितीन वाळके (मालवण),उपाध्यक्षपदी अनुक्रमे सागर शिरसाट ( दोडामार्ग ),महेश नार्वेकर ( कणकवली ),संजय भोगटे (कुडाळ), सहकार्यवाह-चंद्रकांत उर्फ राजू जठार (तळेरे),कोषाध्यक्षपदी- अरविंद नेवाळकर (मालवण) यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून आजीव सभासदांमधून नीलेश सुरेश धडाम (कणकवली),दिपक शांताराम भोगले (मालवण),आश्रय दात्यामधून अवधूत उल्हास शिरसाट (कुडाळ),अनिल श्रीकृष्ण सौदागर (वेंगुर्ले),वार्षिक सभासदमधून अशोक मधुकर गाड (कट्टा मालवण),कुडाळ व्यापारी संघांतून-राजन सुरेश नाईक (ग्रामीण),वेंगुर्ले व्यापारी संघांतून- राजेश गुरुनाथ शिरसाट (शहर),सद्गुरू अनंत तांडेल (ग्रामीण),वैभववाडी व्यापारी संघांतून-संतोष दत्ताराम कुडाळकर (शहर),मंगेश हरिश्चंद्र गुरव (ग्रामीण), देवगड व्यापारी संघांतून-मधुकर हरि नलावडे (ग्रामीण),दोडामार्ग व्यापारी संघांतून- सागर शिरसाट आणि सिध्देश (सनी) केसरकर,स्वीकूत सदस्य म्हणून हर्षल गवाणकर (कणकवली),नंदन वेंगुर्लेकर (वेंगुर्ले) यांची निवड करण्यात आली. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्याप्रसाद बांदेकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी उत्तम प्रकारे कामगिरी बजावली.नुतन जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर व कार्यवाह नितीन वाळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी नुतन अध्यक्ष व कार्यवाह व सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.तर शेवटी मावळते अध्यक्ष नितीन तायशेटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page