व्यापारीवर्गावर कोरोनां चाचणीचा जिल्हाधिकारी यांनी लादलेला आदेश पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी रद्द करावा.;बाबा मोंडकर

व्यापारीवर्गावर कोरोनां चाचणीचा जिल्हाधिकारी यांनी लादलेला आदेश पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी रद्द करावा.;बाबा मोंडकर

सिंधुदुर्ग /-

जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यत कोरोना चाचणी बंधनकारक केली असून चाचणी न केल्यास व्यवस्थापनावर कारवाईचे आदेश दिले आहेत. वास्तविक पाहता कोरोना व्हायरस हा या चाचणी नंतर होणार नाही असे कोणतेही वैद्यकीय प्रमाण नसताना व जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम चालू असताना व्यापारानां नाहक त्रास देणे चुकीचे आहे असे आदेश काढून सरकारने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.ठाकरे सरकारच्या रोजच्या लॉकडाऊनच्या सूचना वजा धमकी ने जिह्यातील व्यापारी असमंजस स्थितीत असून व्यवसाय कसा करावा हेच समजत नाही आहे.लाईट बिल,पाणी,घरपट्टी यांकरामध्ये तसेच बँककर्जामध्ये कुठलीच सवलत न देता ठाकरे सरकार इंग्रजांनांही लाजवेल अशी वसुली जिल्ह्यातील व्यापारी वर्गाकडून चालू आहे. हे सर्व शासकीय कर ,पैसे भरण्यासाठी निर्बंधमुक्त व्यवसाय होणे गरजेचे आहे.तसेच आपल्या जिल्ह्यात पर्यटन व्यवसायावर सागरी तालुके अवलंबून आहेत लॉकडाऊन नंतर पर्यटन व्यवसाय उभारी घेत असतानां रोजच्या लॉकडाऊन च्या धमकीने गेल्या महिन्याभरात पर्यटनसाठी जिल्ह्यात येणाऱ्याची संख्या कमालीची कमी झाली आहे वास्तविक एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या आपल्या भागात पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र पॉलिसी बनविणे गरजेचे होते. परंतु अशा कुठल्याही प्रकारचा दिलासादायक निर्णय न घेता जिल्हातील व्यावसाईकांचा उद्रेक कसा होईल यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून जाणीवपूर्ण प्रक्रिया चालू आहे .भारतीय जनता पार्टी व्यवसाईकांच्या सोबत असून.जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत याविषयी लक्ष देऊन जिल्ह्यातील व्यावसाईकांना जाचक चाचणी रद्द करावी. व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना गरज असलेली पॉलिसी राबवावि अन्यथा व्यवसायीकांच्या होणाऱ्या उद्रेकांस तयार रहावे अशी मागणी भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..