मसुरे /-
कलातपस्वी अप्पा काणेकर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा कै.सौ उमा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार कणकवली क्रमांक ५ च्या शिक्षीका ज्येष्ठ कवयित्री, साहित्यिक, वृत्तनिवेदिका श्रीम.कल्पना मलये यांना नुकताच जाहीर झाला.
कल्पना मलये हया स्वतः कवयित्री असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम त्या करत आहेत. त्यांचे सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर अनेक कार्यक्रम प्रसारित झालेले असून त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक साहित्यिक ,कवयित्री उपक्रमशील शिक्षिका म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.