जिल्हास्तरावरील राजकीय लोक प्रतिनिधीही जाळ्यात..
कुडाळ /-
कुडाळ पोलिस स्टेशन व राज्य राखीव दलाच्या वतीने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या मास्कबाबतच्या मोहिमेत अवघ्या दोन तासात 169 जणांवर कारवाई करत ३३ हजार ८०० रू चा दंड वसुल केला. या कारवाईतून राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदावरील लोकप्रतिनिधीही सुटले नाहीत. एका राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरावरील पद भूषविणार्या एका पदाधिकाऱ्यालाही २०० रू पावती फाडावी लागली.
कुडाळ पोलिस व राज्य राखीव दलाच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात ग्रामिण रूग्णालय व एस एन देसाई चौक येथे ही बेधडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्या सह पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह सुमारे १० कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अवघ्या दोन तासात दोन ठिकाणी 169 जणांवर कारवाई करत ३३ हजार ८०० रु चा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत कोणताही अधिकारी असो वा लोकप्रतिनिधी असो तो या कारवाईतून सुटला नाही. एका राजकीय पक्षाचे जिल्हा पद भूषवणारा एकक्षलोकप्रतिनिधीही या कारवाईत चांगलाच सापडला. रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी विनामास्क आलेल्या या लोकपप्रतिधीलाही २०० रु ची पावती फाडावी लागली. या कारवाई दरम्यान ज्यांना दंड भरावा लागला ते बरेच लोक उच्च वर्गातील असल्याचे लक्षात आले. यातून सर्वसामान्य लोक सर्व नियम पाळतात मात्र काही उच्च वर्गीय नियमांना तिलांजली देत असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत ज्यांचे पैसे भरण्यासाठी पैसा नव्हते त्यांना पोलिस स्टेशनची गाडी बोलवत पोलिस ठाण्यात नेण्यात आले.