कुडाळ /-
आज मुलांकरिता विविध करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत याची माहिती मुलांना होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मुलांकडेही आज नेटची व मोबाईलची सोय उपलब्ध झालेली आहे .याचा योग्य वापर कसा करावा आणि त्यामधून स्वतःचे करिअर कसे घडवावे याविषयी श्री सत्यवान रेडकर (कस्टम अधिकारी मुंबई )यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.
आपल्या जीवनाची सुरुवात कशी झाली आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन अधिकारी पदापर्यंत टप्पा कसा गाठला या विषयी खडतर जीवनाचा प्रवास श्री सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.मुलांच्या विविध करिअरच्या वाटा उलगडण्यात आल्या, याकरिता तिमिरातुनी तेजाकडे हा त्यांनी चालवला उपक्रम याची माहिती दिली.कोकणातील सर्व जिल्ह्यात ही मार्गदर्शन शिबिरे चालू आहेत.इयत्ता नववी ते बारावीच्या पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आजच्या या मार्गदर्शनाचा लाभ घेतला यावेळी संस्था चेअरमन श्री रेडकर गुरुजी,संस्था प्रतिनिधी श्री सुधीर ठाकूर, मुख्याध्यापक श्री कोरे सर, म्हापण सरपंच श्री अभय ठाकूर ,पर्यवेक्षक श्री राजन हंजनकर श्री बोंदर सर, कलाशिक्षक श्री संदीप साळसकर सर ,उद्योजक श्री विजय पाटकर या वेळी उपस्थित होते.
ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांची नेत्र शिबीर चिकित्सा शिबीर विद्यालयात आयोजित केले होते .लाॕकडाऊन च्या काळात मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे डोळ्याचे त्रास मुलांचे सुरू झालेले आहेत, अंधुक दिसणे ,डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे या समस्या निवारण्या करिता ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने मुलांची आरोग्य तपासणी हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला याकरिता ग्लोबल फाऊंडेशन तर्फे श्री .लक्ष्मण देसाई. श्री .आर.बी. तेली.श्री .मिनर्व्हास परब.श्री .उमेश गावडे. उपस्थित होते.ग्लोबल फाऊंडेशन तर्फे नियामित विविध उपक्रम विद्यालयात घेतले जातात.