कुडाळ /-

मुंबईतील कित्तेक वस्त्यांमध्ये गलिच्छ भिंती आपण पाहतो .अशा भिंतींवर स्वच्छतेचा नारा देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम पाट गावचा सुपुत्र रोहित येरम करत आहे. स्वच्छता अभियानाचा नारा सुरू झाला आणि अशा भिंती स्वच्छता संदेशाने रंगू लागल्या .या भिंती कल्पकतेने रंगविलेल्या पाहिले की थक्क व्हायला होते.आधुनिक कलेचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी विविध तंत्राचा वापर करून मुंबईच्या सौंदर्यात भर घालत आहेत आणि स्वच्छतेचा संदेशही देत आहे. पाट हायस्कूल चा रोहित कृष्णकमळ येरम हा विद्यार्थी हायस्कूल मध्ये असणा-या कै.सन्मा.एकनाथजी ठाकूर कला अकादमी च्या उपक्रमातून कलाशिक्षक श्री साळसकर संदीप यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला आहे. विद्यार्थीदशेत चित्रकलेत राज्यरीय प्रथम पारितोषिके पटकावली आहेत.कलेची विशेष आवड असल्यामुळे मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वरळी येथे शिक्षण घेऊन आज कलाक्षेत्रात विविध पेंटिंगची निर्मिती करत आहे .शिक्षण घेता घेता वॉल पेंटिंग हा अर्थार्जनाचा भाग म्हणूनआणि आपली आवड म्हणून करु लागला. आज स्वच्छता संदेश देणाऱ्या जवळजवळ पाचशे वाॕल त्यांनी रंगविलेल्या आहेत. मुंबईच्या विविध भागातील जवळजवळ 30 ते 40 फूट रुंदीच्या भिंती कल्पकतेने रंगून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे .प्राणी, पक्षी ,पाने, फुले ,मानवाकृती अशा रचनांमधून या भिंती सुशोभित करण्यावर त्यांचा भर असतो आणि सर्वांसाठी स्वच्छतेचा संदेशही असतो. चित्रकलेच्या माध्यमातून ज्या विविध संधी आज उपलब्ध होत आहेत त्यापैकी वॉलपेंटिंग ही सुद्धा एक सुवर्णसंधी आहे हे त्याच्या कृतीतून दिसते. आज वॉल पेंटिंग करणे लोक पसंत करतात पूर्वीच्या काळी एखाद्या कॅनवास पेंटिंग आपल्या घरात शोभा देण्यासाठी लावले जात होते.पण काळाच्या ओघात ही पद्धत मागे पडत चालली आहे .रोहित याने कॉलेजमध्ये असतानाच आपला कॉलेजचा खर्च अशा कामांमधून जमविलेला आहे. आपल्या सोबत कॉलेजमध्ये समीर सय्यद ,अनिशा सरजीनी,प्राची बोटाले, हर्षद सोनवणे, यश हांडे नमिता पावसकर अशा निवडक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन नवी मुंबई, वाशी ,नेरूळ ,बेलापूर, जुईनगर अशा मुंबईतील विविध भागातील भिंती रंगविल्या आहेत. यासाठी अॕकरॕलीक कलर ,रॉयल कलर चा वापर केलेला आहे याशिवाय मुंबईतील थिएटर, षण्मुखानंद हॉल अशा ठिकाणीही वॉल पेंटिंग केलेली आहेत .आज कित्येक कलाकार प्रत्येक गावात असून अशा कामांमधून त्यांनी प्रेरणा घेतली तर कोणताही कलाकार रिकामी राहणार नाही. मोठमोठ्या शहराचा विचार करता हे न संपणारच काम आहे. कलेच्या क्षेत्रात आवड असणाऱ्या मुलांकरिता अनिमेशन .कार्टून आर्ट. फोटोग्राफी पेंटिंग अशी विविध क्षेत्रे उपलब्ध आहेत हा त्याचा मनोदय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page