कुडाळ /-
शासनाने बाळासाहेबांची शासकीय जयंती करण्याचे आदेश काढले आहेत.बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांनी घडविले. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला मोठं मोठ्या पदापर्यंत त्यांनी पोहोचविले.बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील खेळाडूंसाठी कुडाळ तालुक्यात दर्जेदार व अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारले जात आहे.त्याचप्रमाणे मच्छिन्द्र कांबळी नाट्यगृह ,महिला बाल रुग्णालय, ओरोस येथे सिंथ्याटिक धावपट्टी, हि महत्वाची कामे केली जात आहे. बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारणाचा दिलेला वसा शिवसैनिक जोपासत आहेत.समाजकार्याची हि घौडदौड अशीच सुरू ठेवावी. त्यासाठी लागणारे सहकार्य आपण करू असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदुहृदयसम्राट चषक २०२१ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन कुडाळ तहसील कार्यालया शेजारील क्रीडांगण येथे करण्यात आले होते.या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आमदार वैभव नाईक व उद्योजक पुष्कराज कोले यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्योजक पुष्कराज कोले म्हणाले,आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथे भव्य क्रीडा संकुल उभारले जात आहे. सर्व सोयी सुविधांयुक्त जिल्हयातील पाहिले हे क्रीडांगण असणार आहे. कला क्रीडा आणि ज्ञान असा त्रिवेणी संगम सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. या तिन्ही मध्ये आपला जिल्हा अग्रेसर आहे. क्रीडा क्षेत्रात युवकांनी प्रगती करून जिल्ह्याचे नाव आणखी उज्ज्वल करावे असे सांगत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, विकास कुडाळकर,रुपेश पावसकर, संजय भोगटे,जीवन बांदेकर,नगरसेवक सचिन काळप,नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर ,युवासेना सुशील चिंदरकर, राजू गवंडे , कृष्णा तेली, नितीन सावंत शेखर पाटकर आदी उपस्थित होते.