कुडाळ /-
कुडाळ एमआयडीसीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जोडरस्त्यांचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन शासनाने उद्योगधंद्यांसाठी एमआयडीसी विकसित करण्यासाठी जमिनी ताब्यात घेतल्या होत्या. यासाठी जमिनदारांना दिलेला मोबदलाही फारच अल्प होता. त्यात त्यांच्या अडचणीही मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या होत्या. त्यापैकीच एक समस्या होती ती जोडरस्त्याची. पण ही समस्या अनेक वर्षांनंतर सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अजित मार्गी यांनी प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मा.पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेतली त्यांच्या ह्या सर्व मागण्या कानावर घातल्यानंतर लगेचच पालकमंत्री महोदयांनीही एमआयडीसी चे वरिष्ठ अधिकारी तसेच दुसरे अधिकारी श्री.रेवंडकर यांना समोर बोलावून घेत सर्व जोड रस्त्यासाठी असलेल्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. याप्रसंगी श्री.अजित मार्गी यांनी श्री.रुपेश पावसकर, सरपंच शेखर गावडे ,यांचे आभार मानले.