कोकणचा दशावतार राजाचा जीवनपट पोहोचवला सातासमुद्रापार
कुडाळ /-
प्रशासनाच्या कामाची धुरा संभाळून आपल्या अंगातील उपजत कला सादर करून तसेच कसाल गावचे तलाठी म्हणून काम करणारे संतोष बांदेकर यांचा कसाल ग्रामपंचायतीमार्फत आज सत्कार समारंभ करण्यात आला याचे विशेष कारण म्हणजे ” राजा” या लघुपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर शिरपेचात दुहेरी सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून “राजा” ह्या लघुपटाला मान मिळाला आहे.
कोकणाचा दशावतार राजाचा जीवनपट उलगडणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक संतोष बांदेकर दिग्दर्शित” राजा “हा लघुपट नाशिक शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम पारितोषिकेचा मानकरी ठरला.
कुडाळ तालुक्यातील गोठस सारख्या ग्रामीण भागातील गावात एखाद्या लघुपटाचे चित्रीकरण करण्याचे स्वप्न सत्यात उतरवून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचविण्याचे धाडस जर ग्रामीण भागातील तरुण कलाकार शेती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळून करत असतील तसेच चित्रीकरणाच्या सोयीसुविधा नसताना आपल्या गावातील उपकरणांचे वापर करून आपल्याच परिसरात गावात या राजाचा लघुपटाचे “राजा “चे चित्रीकरण पूर्ण केले गेले हे च्या राजाचे दिग्दर्शक संतोष बांदेकर यांचे यश आहे.
या लघुपटाच्या निमित्ताने कोकणचा निसर्ग कोकणची लाल माती उपजत कलाकार आणि रात्रीचे राजा असलेल्या दशावतार नाटकाचा कलाकारांची व्यथा जागतिक स्तरावर मांडण्यात आली होती. या शॉर्ट फिल्म फेस्टिवल चे परीक्षक म्हणून श्याम शिंदे किरण मोरे यांनी काम पाहिले.
“राजा” मध्ये गोठस या ग्रामीण भागातील कलाकार नंदू वाळके, किशोर सरनोबत ,दीपक वाळके ,नारायण लाड, सुनील कदम, केतन गोठसकर ,शंकर वाळके, किशोर वाळके,तसेच दशावतारी कलाकार मामा तेजम व मध्यवर्ती भूमिका प्रतीत यश अभिनेत्री कल्पना बांदेकर यांनी साकारली आहे लेखन दिग्दर्शक संतोष बांदेकर संकलन छायाचित्रण संगीत ही बाजू सागर बांदेकर पुंडलिक सदू यांनी सांभाळली.
कसाल ग्रामपंचायत कार्यालय येथे तलाठी या पदावर काम करत असलेले व “राजा” या लघुपटाच्या सन्मानाने पारितोषिक पटकावले “संतोष बांदेकर,” यांचा सत्कार कसाल ग्रामपंचायतीचे सरपंच सौ संगीता परब, ग्रामविस्तार अधिकारी सौ. एस. बी. कोकरे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी नितीन हांगे, उपसरपंच दत्ताराम सावंत, कसलं तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राणे तसेच अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट नर्सिंग कॉलेजचे संचालक चिराग बांदेकर, पोलीस पाटील अनंत कदम उपस्थित होते.