वेंगुर्ला /-
श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयाचे उदघाटन आज शनिवार १६ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. तत्पुर्वी सकाळी ०९.३० वाजता भव्य बाईक रॅली आयोजित केली आहे. तरी युवाशक्ती ने प्रचंड उर्जेसहित बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
सन १५२८पासून अविरत चालणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिर पुनर्स्थापनेच्या संघर्षामध्ये आपण हिंदू समाजाने विजय मिळवला आणि बाबरी मानसिकतेचा पराभव झाला. यासाठी आपल्याला जवळजवळ ७६ प्रत्यक्ष युद्ध करावी लागली आहेत.आपल्या लाखो करोडो पूर्वजांनी या संघर्ष यज्ञवेदी मध्ये बलिदान दिले आहे.
या सर्व संघर्षामध्ये त्या त्या वेळच्या तरुणांचे योगदान निर्णायक राहिले आहे.
राम मंदिर निर्माणाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वाभिमानाच्या पुनर्स्थापनेच्या या कार्यात आपण तरुणांचे विशेष व अधिक समर्पण असणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे. यासाठी आपण सर्वजण मिळून राममंदिर निर्माण निधी समर्पण अभियान आपल्या जिल्ह्यात करीत आहोत.
या अभियानाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयाचे उदघाटन तसेच भव्य बाईक रॅली साठी युवाशक्ती ने प्रचंड उर्जेसहित बहुसंख्येने उपस्थित राहूया आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या या अभियानामध्ये अधिक योगदान देऊया, असे आवाहन वेंगुर्ले तालुका संयोजक गिरीश फाटक आणि सहसंयोजक मंदार बागलकर यांनी केले आहे.