कुडाळ /-
कुडाळ मधील क्रेटा गाडीला उत्तुर येथे भीषण अपघात झाला असून अपघातात कुडाळ मधील रोहित रमाकांत कुडाळकर हा युवक वय 22 जागीच ठार झाला आहे.महाबळेश्वरहुन कुडाळ येथे सर्व मित्र घरी परतत असताना आज पहाटे साडेतीन वाजता हा भीषण अपघात झाला असून. कुडाळ येथील अक्षय वालावलकर यांच्या मालकीच्या एम. एच. ०७ ए. जी.-५१६६ उत्तुर येथे ताबा सुटल्याने जि.कोल्हापूर येथे भीषण अपघात झाला आहे.
ओंकार मंगेश वालावलकर हे आपल्या भावाच्या मालकीची गाडी घेवून आपले मित्र रोहन कुंभार, जगन्नाथ पेडणेकर, सायल परब, रोहीत कुडाळकर असे पाच जण मिळून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी फिरायला गेले होते. पर्यटन आटपून कुडाळला परत येत असताना पहाटे उत्तर येथे साडेतीन वाजता गाडी आली असता चालक ओंकार वालावलकर याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने तीन पलटी मारल्या यात रोहीत रमाकांत कुडाळकर वय 22 हा जागीच ठार झाला तर जगन्नाथ पेडणेकर हा गंभीर जखमी झाला आहे.गंभीर जखमी जगन्नाथ पेडणेकरला तत्काळ गडिंग्लज येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहेत.तर ओंकार वालावलकर, सायल परब, रोहन कुंभार हे किरकोळ जखमी झाले असून आजरा पोलीस ठाण्यात त्यांचे जाबजबाब चालू आहेत घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे सुशील चिंदरकर, राजू गवंडे, राम राऊळ, शेखर कुंभार यासह कुडाळमधील लोकानी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मदत कार्य सुरू केले आहे. सुशील चिंदरकर सह टीम आजरा पोलीस ठाण्यात दाखल झाली,दरम्यान या घटनेने कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे. मृत रोहीत रमाकांत कुडाळकर च्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुडाळ मध्ये आणण्यात येणार आहे.मृत रोहीत कुडाळकर हा खालची कुंभारवाडी येथील असून आईवडीलांचा एकुलता एक मुलगा,तर वडील अपंग असून कष्ट करून मुलाला मोठ केल होत. कुडाळकर कुटुंबियांवर काळाचा घाला झाला आहे.