कुडाळ /-
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीचा नवीन बंधारा झाल्यामुळे भंगसाळ नदी आज पूर्ण भरून वाहत आहे. गेल्या ४० वर्षात असे भंगसाळ नदीला पाणी तुडुंब भरले न होते. भंगसाळ नदीला आज हे वैभव प्राप्त झाले हे केवळ आपले कुडाळ मालवणचे आमदार वैभवजी नाईक यांच्यामुळेच….नदी तुडुंब भरल्यामुळे व पाण्याची सिंचन क्षमता वाढली.त्यामुळे कुडाळ शहरातील सर्व विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनामध्ये समाधान व्यक्त होत आहे.कुडाळ शहराला पाण्याची कमतरता आता पडणार नाही .तसेच कुडाळ शहराच्या लगतची सर्व गावे सर्व वाड्या पावशी ,संगीर्डेवाडी, आंबडपाल,मांडकुली ,पिंगुळी,अशी बरीच गावे यांना या बंधाऱ्याचा फायदा होऊन तेथील सर्व शेत जमीन ओलिताखाली आलेली आहे.त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना याचा पुरेपूर फायदा होणार आहे.
कुडाळ शहारातुन आमदार वैभव नाईक यांचे आभार लोकांच्या तोंडून बोलले जात आहेत.म्हणून कुडाळ शहरातर्फे आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्याचे शहर वासियांनी ठरविले आहे.तसेच या भरलेल्या नदीमध्ये बोटिंग व्हावे अशी लोकांची लोकांची मागणी होत आहे.
तसेच या सुंदर तुडुंब भरलेल्या भंगसाळ नदीमध्ये कुडाळ शहरातील सांड पाणी व मच्छिमार्केटमधील घाणीचे सांडपाणी नगरपंचायतने भंगसाळ नदीच्या पात्रात सोडलेले आहे. नदीपात्रात घाणीचे पाणी मिसळ होत आहे त्यामुळे पूर्ण नदीचे पाणी दूषित होत आहे.याची जाणीव नागरपंचायतला का होत नाही. तरी नागरपंचायतने तातडीने सांडपाणी सोडण्याचा मार्ग बदलून बंधाऱ्याच्या खाली सोडावा.अशी मागणी सर्व कुडाळवासीय ग्रामस्थांची आहे.असे शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाठ यांनी मीडियाशी बोलताना माहिती दिली आहे.