सावंतवाडी /-
शेर्ले या गावात देऊळवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी संपर्क साधत संजू विरनोडकर टीम ला पाचारण केले होते. येथील नागरिकांन मध्ये कोरोना आजाराचे संक्रमण होऊ नये यासाठी या भागात निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब आणि सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांनी घेतला आहे. यावेळी रुग्ण सापडलेल्या घरात, आजूबाजूच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच उदय धुरी, श्याम सावंत, व नागरिकांनी उत्स्फूर्त पणे या कामात सहभाग घेतला होता. शेर्ले येथे कोव्हिड सेंटर असल्याने तेथे रुग्णांची रुग्णवाहिकेतून ने आण केली जात असल्याने तेथील नागरिक अगोदरच भीतीच्या छायेखाली होते. परंतु संजू विरणोडकर यांच्या या उपक्रमामुळे सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
यावेळी संजू विरणोडकर टीमचे संतोष तळवणेकर, आकाश मराठे, सचिन घाडी, तुषार बांदेकर हे सदस्य उपस्थित होते. यावेळी शेर्ले गावाने मागणी केल्यानंतर निर्जंतुकीकरणाची त्वरित व्यवस्था नगराध्यक्ष संजू परब यांनी करून दिल्याने सर्वांनी त्यांचे देखील आभार मानले आहेत.