कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेमार्फत जिल्ह्यातील होतकरू नृत्य कलाकारांसाठी नृत्य शिबिरे तसेच शाळा, कॉलेज या ठिकाणी फ्लॅश मॉब नृत्य प्रकार असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेची पहिली सभा नुकतीच राहूल कदम यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे झाली, त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. यावेळी जिल्हा आयोजक म्हणून संतोष पुजारे आणि सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून संजय पेटकर यांनी निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा नृत्य परिषदेच्या या पहिल्या सभेची सुरुवात अध्यक्ष राहुल कदम आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली. जिल्ह्यातील नृत्य चळवळ मजबूत करण्याच्या दृष्टीने यावेळी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. संघटनेचा प्रसार करण्यासाठी शाळा, कॉलेज या ठिकाणी फ्लॅश मॉब नृत्य प्रकार पदाधिकारी व सदस्यांमार्फत करून नृत्य परिषद महाराष्ट्र, सिधुदुर्ग मध्ये सामील होण्याचे कलाकारांना आवाहन करणे आणि नृत्य परिषद महाराष्ट्रचा प्रचार करणे हा उपक्रम भविष्यात राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोडा, दोडामार्ग, कुडाळ, मालवण, ओरोस, कणकवली, देवगड, वैभववाडी, खारेपाटण याठिकाणी लवकरच ब्रेकडान्स शिबीर आणि युवती मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नृत्य परिषदेचे यु ट्यूब चॅनेल निर्मितीबाबतही चर्चा करण्यात आली. नृत्य परिषदेच्या वतीने दोन महिन्यातून एकदा नृत्य शिबीर देखील घेण्यात येणार आहे.
या बैठीकीत दोन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. जिल्हा आयोजक म्हणून संतोष पुजारे आणि सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून संजय पेटकर यांची निवड करण्यात आली,या बैठकीला अध्यक्ष राहुल कदम, कार्याध्यक्ष महेश जांबोरे, इ[उपाध्यक्ष पूजा पारधी, जिल्हा सहपालक सुदेश वाडकर, खजिनदार अदिती दळवी, युवती कनिष्ठा चांदणी कांबळी, कुडाळ उपाध्यक्ष भूषण बाक्रे, सचिव रोहित माने, उपसचिव सागर सारंग आणि सदस्य उपस्थित होते.