वेंगुर्ला /-

घनकचरा व्यवस्थापन बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेंगुर्ले न.प.ला करण्यात आलेल्या दंडाचा भुर्दंडचा भार
शहरातील नागरिकांवर पडू देणार नाही.न.प.फंडातून हा दंड भरण्यास सेनेचा विरोध राहील.याबाबतीत जबाबदार असणाऱ्याकडून हा दंड वसूल करण्यात यावा,यावर शिवसेना ठाम राहील,असा इशारा आज वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
वेंगुर्ले न.प.दंडाबाबत वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने संपर्क कार्यालयात सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी,वेंगुर्ले उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,शहरप्रमुख अजित राऊळ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, नगरसेवक संदेश निकम,तुषार सापळे,सुमन निकम,सुकन्या नरसुले,मंजुषा आरोलकर,उर्मिला निरवडेकर,विवेकानंद आरोलकर, गौतम मुळे, गजू गोलतकर,हेमंत मलबारी,रावसाहेब शेलार
डेलीन डिसोजा,
आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहरातील नागरिकांच्या सहकार्याने आजवर वेंगुर्ले नगरपालिकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.परंतु स्वच्छतेच्या बाबतीत यापुढे प्रथम ५० मध्ये न.प.येणे शक्य नाही.स्वच्छ भारत च्या बाबतीत कोकरेंनी चांगले काम केले,परंतु साबळेंनी राबविलेल्या कार्यपद्धतीमुळे उत्पन्न घटले आहे.मच्छिमार्केट तसेच न.प.विविध कामांसाठी आमदार दिपक केसरकर यांनी
जिल्हा नियोजन मधून
व खासदारांनीही निधी दिला आहे.परंतु आज न.प.ची अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत.तसेच मच्छिमार्केट निधीचे श्रेय माजी आमदार कै. पुष्पसेन सावंत यांनाही जाते.परंतु २६ जानेवारीला उदघाटन होईल काय ?असाही सवाल उपस्थित करण्यात आला.याबाबत भाजपा पदाधिकारी यांच्याकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे,असा आरोप करण्यात आला.त्यामुळे जनतेच्या पैशातून सदर झालेला दंड भरू देणार नाही,असा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकारीनी दिला.यावेळी सुनिल डुबळे,बाळू परब,संदेश निकम,तुषार सापळे आदींनी मते मांडली.शिवसेना शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कायम विकासकामे राबवित राहील,असे पदाधिकारीनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page