अखेर निवती ग्रामस्थांनी कुडाळ पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयच्या जिल्हा ऑफिस समोरील आमरण उपोषण हे निवती ग्रामस्थांनी मागे घेतले आहे.हे उपोषण ग्रामस्थांनी ठेकेदाराने लाईनआउट करून रस्त्याचे काम सुरू केले हे प्रत्यक्ष पाहिल्यावर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा,ठेकेदार काम करत नाही संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,असे सांगत आज २९डिसेंबर रोजी निवती येथील १००ते १५० निवती ग्रामस्थांनी ,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या कुडाळ येथील मुख्य कार्यालयात उपोषण सुरू केले होते.
दोन दिवस पूर्ण उपोषण केल्यावर ठेकेदाराने काम सुरू केले यावर हे उपोषण निवती ग्रामस्थांनी सोडले आहे.उपोषण स्थळी कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील यांनी पत्र दिल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले.यावेळी किशोर सारंग ,तृप्ती कांबळी ,विलास आरोलकर, लक्षुमन नाईक,उदय सारंग ,सुरेश पडते ,कांचन पाटकर,अनिल मेतर ,वीरश्री मेंतर ,निलेश मस्त,नागेश सारंग ,भारती धुरी,अजित खवणेकर ,सुधीर मेतर ,रामचंद्र भगत ,नमिता घाटवळ हे सर्व निवती ग्रामस्थ उपोषण सोडते वेळी उपस्थित होते.