विरोधी नऊ सदस्यांचा गंभीर आरोप..

कोल्हापूर /-

चंद्रे(ता. राधानगरी) येथील लोकनियूक्त सरपंच ङाॅ. तेजस्विनी देसाई यांनी सरपंच पदाच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत विरोधी नऊ सदस्य व त्यांच्या दोन सर्मथक असलेल्या सदस्यानां विश्वासात न घेता त्यांच्या कूटूंबातील एका व्यक्तीने ग्रामसेवक यानां हाताशी धरून मनमानी कारभार करून आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. तसेच त्यांनी ग्रामपंचायतीचा वापर स्वमालकीच्या लिमिटेङ कंपनी प्रमाणे केला असा गंभीर आरोप विरोधी नऊ सदस्यांनी एका निवेदनाद्भारे केला आहे.

निवेदनातील आशय असाः गेल्या तीन वर्षाच्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत सरपंच ङाॅ. तेजस्विनी देसाई यांनी ग्रामपंचायतीचा कारभार करतानां चेक किंवा इतर कागदपत्रावर कोणीतरी सांगतात म्हणून आणी कधीही कागदपत्रे न वाचता सह्या केल्या आहेत. दि. 30/11/2020 च्या ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये ठराव क्रमांक —2′ गणपती विसर्जन खर्च 2800 रूपये चेक ने अदा केले आहेत. याबाबत सरपंच यानां विचारले आसता त्यांनी माहीती देण्यास टाळाटाळ केली .त्यावर त्यांनी ग्रामसेवक सूनिल निकम आल्यानंतर खूलासा करतील अशी पळवाट काङली. तसेच कोविङ महामारीचा खर्च 60 ते 70 हजार रूपये दाखविला आहे. तसेच गावातील दिवाबत्तीवरील केलेल्या खर्चात देखील अनियमितता दाखवत आहे. त्यामूळे दिवाबत्तीवरील खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. पाणीपूरवठा मोटरपंप दूरूस्तीमध्ये तसेच पाईप लाईन लिकेज काढण्याच्या कामामध्ये सूद्धा अनियमितपणा दिसून येत आहे.सन 2019/20 च्या जून महिण्यामध्ये दोन मोटारी रिवायङिंग केलेल्या दिसून येत असून त्याचे बिल प्रत्यक्ष काम केलेल्या दूकानदारास अदा केले आसतानां परत 15 दिवसानंतर त्याच मोटर दूरूस्तीचे बिल दूसर्‍या दूकानदाराकङून बोगस बिल आणून खर्च टाकून सदर रक्कम हङप केली आहे. तसेच सरपंच यांनी सदस्यानां ङावलून ग्रामपंचायतीचा कारभार कोणत्याही पदावर नसलेल्या व्यक्तीने ग्रामसेवकानां हातीशी धरून गॅरमार्गानी केला आहे.

पाणीपूरवठा कामाच्या नवीन योजनेच्या बाबतीत सरपंच आणी त्यांचे कूटूंबिय व त्यांचे हितचिंतक हे 1 कोटी 17 लाखाची नवीन पाणीपूरवठा स्कीम मंजूर करून आणली आहे’ असा दिंङोरा ते गावात पिटत आहेत. त्यांनी या कामाचे मंजूरीपत्रक दाखवावे आम्ही जाहीर माघार घेतो. सदरची योजना अद्यापही मंजूर नसतानां गावातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सबंधीत व्यक्तीकङून केले जात आहे. तसेच सरपंचांचा भ्रष्टाचार उघङ झाल्याने ग्रामसेवक दिर्घ मूदतीच्या रजेवर गेले आहेत. यावरूनच त्यांचा कारभार कसा आहे हे दिसून येते. असे ही या निवेदनात म्हणटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page