जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन..
सिंधुदुर्ग /-
भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेला 34 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संत शिरोमणी रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, विद्यार्थी सन्मान व बचत गटच्या महिलांचा विशेष सन्मान सोहळा, कोरोना योध्या तसेच डॉक्टरांनमार्फत आरोग्य शिबीर कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांचे अध्यक्षतेखाली रविवार. २७ डिसेंबरला सकाळी ९.०० वा. श्री रवळनाथ मं रंगमंच, ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर
आमदार वैभव नाईक आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी श्रीम के, मंजूलक्ष्मी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे जि.प. अध्यक्षा. समिधा नाईक जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत जि.प. उपाध्यक्ष श्री. राजेंद्र म्हापसेकर जि.प.गटनेते नागेंद्र परब
माजी जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई
भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष, श्री. पंढरी चव्हाण शिवसेनायुवा नेते,संदेश पारकर अमरसेन सावंत सभापती नुतन आईर उपसभापती जयभारत पालव तानाजी परब. मदन परब
समाज पदाधिकारी लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव आदी उपस्थित राहणार आहेत आरोग्य शिबिराने कार्यक्रमाची सुरुवात होणार सकाळी साडे नऊ वाजता शिबिराला सुरुवात होईल.