सिंधुदुर्ग /-
महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांचे जिल्हा युवकांकडून सहर्ष स्वागत,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरद कृषी भवन मध्ये झालेल्या भव्य मेळाव्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादीच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय मेहमूब शेख यांचे स्वागत करताना जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा.प्रफुल्ल सुद्रिक आणि युवक कार्यकर्ते. मेहबूब शेख यांनी युवकांचे चर्चा करू संघटना वाढीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना पोलीस भरती एमपीएससी यूपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात होत राहील तसेच संघटना वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करा असेही आवाहन केले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, उपाध्यक्ष संदेश सावंत ,हासीम मुजावर ,मिलिंद घाटगे ,जिल्हा सरचिटणीस हितेश कुडाळकर ,योगेश मलांडकर,सुनील हळदणकर विधानसभा अध्यक्ष कुडाळ-मालवण,सचिन तेंडुलकर कणकवली विधानसभा अध्यक्ष ,देवा पिळणकार ,सागर वारंग,महेंद्र रावराणे,महेश कदम ,बंटी परब अन्य युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.