सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे हप्तेखोरं अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत .त्यांना वेतनापेक्षा हप्ता अधिक मिळत असल्याने अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत सावंतवाडी नागरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व ढोल बजाव आंदोलन सुरु केले आहे तर संबंधित हप्तेखोर अधिकार्यांवर कारवाई करून जिल्ह्यातील अवैध धंदे तातडीने बंद करा अशी मागणी केली आहे.
सावंतवाडी नागरिक कृती संघर्ष समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यातील अवैध धंद्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे नागरिक कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात हरी गावकर ,अमोल साटेलकर,श्यामसुन्दर आजगावकर, शकुंतला पनसिकर,लता चव्हाण,एल एस निचम, आदि विविध संघटनाचे पधाधिकारी,सहभागी झाले आहेत
आंदोलनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्या बाबत जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष्य वेधले आहेत या निवेदनातून त्यानी जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरु आहेत त्यांना वेतनापेक्षा हप्ते अधिक मिळत असल्याने जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
शासनाने बंदी घातलेला गुटखा ,गोवा बनावटीची विषारी दारू ,अमली पदार्थ, याची विक्री आणि तस्करी राजरोसपणे सुरु आहे. त्यासाठी काही अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचे हप्ते सुरु आहेत .”हप्ता द्या आणि मनपसंत अवैध धंदे करा “अशी अघोषित शासकीय जाहिरातच या हप्तेखोर मंडळीनी काढल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीक- ठिकाणी दिसून येत आहे अवैध व्यवसायात अल्पवयीन मुलांसहित तरुण-तरुणी सहभागी होऊन अमली पदार्थांचे शिकार होत आहेत. भेसळयुक्त विषारी दारू मुळे अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील महिलांना विधवा व मुलांना अनाथ बनवण्याचा कारखाना, जिल्ह्यात व्यवसाय करणाऱ्यानी लाचखोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चलविला आहे .असा आरोप केला आहे अशा लाचखोर अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यासाठी,आज नागरी कृती संघर्ष समितीच्या वतीने सुनील पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे.