भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पिगुंळी पं.स.सदस्या सौ.निलिमा वालावलकर यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी

भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पिगुंळी पं.स.सदस्या सौ.निलिमा वालावलकर यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी

कुडाळ पोलीस स्टेशनला याप्रकरणी लेखी तक्रार

कुडाळ /-

नुकत्याच भजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सौ.वालावलकर कुटुंबासहीत पिगुंळी काळेपाणी येथे पती व दोन मुला सहीत राहतात पिगुंळी पंचायत समिती सदस्य स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवून विजय झालो.३१ ऑक्टोबरला कुडाळ मध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याच रात्री दहा वाजता कुटुंब सहित आम्ही घरी असताना कुडाळ मधील चार भाजप कार्यकर्ते आलिशान गाडी घेऊन माझ्या घरी आले.मला धमकी दिली तुम्हाला निवडणूकीला खर्च केला आम्ही तो आम्हाला परत करा तुम्हाला निलेश राणे काय हे माहित आहे ना काय करू शकतात?तुमच्या पतीला व मुलांना मारहाण करू शकतात. मी शिवसेनेत प्रवेश केला पिंगळी वासियांच्या विकासासाठी केला.

निवडणूक लढवली स्वतःच्या खर्चाने लढवली मी कुणाकडून व पक्षाकडून पैसे घेतले नाही. माझी व्हाट्सअप द्वारे नाहक बदनामी करण्यात येत आहे.निवेदन द्वारे तक्रार केली आपण योग्य ती समज देण्यात यावी माझे कुटुंब व मी भयभीत,दडपणाखाली दोन दिवस आहोत आमच्या कुटुंबावर अनुचित प्रकार मारहान झाली याला हे चार जण जबाबदार राहतील असे अर्जात नमूद करण्यात आले.

भविष्यात मला कुटुंबाला कुठलाही धोका होणार नाही अनुचित प्रकार घडणार नाही अशा प्रकारचा जबाब त्यांच्याकडून घ्यावा मला कुटुंबाला न्याय मिळावा महिला म्हणून सहानुभूती मिळावे.अर्ज चा योग्य विचार विनिमय करून मला न्याय मिळावा.यावेळी कुडाळ पोलीस स्टेशनला वालावलकर यांच्या सोबत पोलीस निरीक्षक यांनां निवेदन देताना अर्जदार सौ.निलिमा वालावलकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते,विकास कुडाळकर,सुशिल चिंदरकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..