▪️एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचाऱ्यांनाही आता चाईल्डकेअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे.
*लाभ* : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी याची घोषणा केली. एकल पालकत्व स्वीकारलेले पुरूष कर्माचारी म्हणजे विधुर, घटस्फोटीत अथवा अविवाहित कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले.
*निर्णय* : हा मोठा निर्णय असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश यापूर्वीच दिले होते, मात्र काही कारणास्तव निर्णय सर्वांपर्यंत पोहोचला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
▪️“ज्या कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत चाईल्डकेअर लीव्ह हवी आहे, अशा कर्मचाऱ्यांची ती सुट्टी यापूर्वीच मंजूर केली आहे.
*कन्सेशन* : कर्मचाऱ्यांना चाईल्ड केअर लीव्हवर असताना लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशनचा लाभही घेता येणार आहे.
*भरपगारी* : पहिल्या वर्षात संपूर्ण चाईल्ड केअर लीव्ह ही भरपगारी रजा म्हणूनही वापरता येईल. तसेच दुसऱ्या वर्षी भरपगारी रजेच्या ८० टक्केच चाईल्ड केअर लीव्हच्या स्वरूपात वापरता येईल,” असंही सिंह यांनी स्पष्ट केले.