नवी दिल्ली/-
▪️देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने ७८ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत ५०,१२९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
▪️आजवर ७० लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८,६४,८११ वर पोहोचली आहेत.
▪️६,६८,१५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ७०,७८,१२३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ६२,०७७ रुग्ण बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच १,४०,७०२ वर पोहोचली आहे.
▪️भारतात आजवर कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या १,१८,५३४ इतकी असून ५७८ नव्या रुग्णांचा २४ तासांत मृत्यू झाला आहे.
▪️देशातील एकूण १,४०,७०२ अॅक्टिव्ह रुग्णांपैकी महाराष्ट्र अद्यापही रुग्णांची संख्या कायम आहे. आजवर महाराष्ट्रात १४,५५,१०७ रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी ४३,१५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.