मुंबई /-
मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मी गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या भाषणांची जुगलबंदी पाहिली आहे. मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकली आहेत. या गोष्टी राजकारणाचा भाग आहेत असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे यांना शिवसेनेची ऑफर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान आज भगवानगडावरुन पंकजा मुंडे या महाराष्ट्राला संबोधित करणार आहे.
विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर चार ते पाच महिन्यांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. ऊसतोड कामगार आणि इतर सर्वच गोष्टींवर मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. मी स्वतः भगवान गडावर दर्शनला निघाली आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्तेही असतील त्या सर्वांसोबत मी निघाली आहे. भगवानगडावरुन मी ऑनलाइन संवाद साधणार आहे. लोकांना तिथे न येण्याचं आवाहनही मी केलं आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.