रत्नागिरी /-
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती, परंतु आज अचानक पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला. आज ७९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार १४४वर पोहोचली आहे. आज ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार २७४ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ८९.४६ आहे.
आज रत्नागिरी १ आणि संगमेश्वर १ अशा २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या २९८वर पोहोचली आहे. मृतांची टक्केवारी ३.६५ टक्के इतकी आहे, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून आज बुधवारी (दि. १४) ही माहिती देण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे
*आरटीपीसीआर*
▪️मंडणगड १
▪️खेड ५
▪️गुहागर १
▪️चिपळूण ७
▪️संगमेश्वर ६
▪️रत्नागिरी ७
एकूण २७
*रॅपिड ॲंटिजेन टेस्ट*
▪️दापोली २
▪️चिपळूण २०
▪️रत्नागिरी ४
▪️लांजा २६
एकूण ५२