सिंधुदुर्गनगरी /-
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील DCHC येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रुग्णांमध्ये सामाजिक अंतर राखून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मनाची ताकद आणि संयम बाळगल्यास छोटयामोठया संकटाबरोबर लढू शकू अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण ,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील ,डॉ नागेश पवार फिजिशियन ,रेश्मा भाईप क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट , श्री महेश जोगदंड विशेष तज्ज्ञ शिक्षक, श्रीमती भोई अधिपरिचारिका, जिल्हा मानसिक विभागातील परिचारिका व सर्व कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालय परिचारिका उपस्थित होते .
या वर्षी मानसिक आरोग्य दिनानिमित्त जगावर आलेल्या कोरोनाचा संकटांमध्ये सगळ्यांना मनाची बळकटी ,निरोगी व सुदृढ मनस्वास्थ लाभो अशी प्रार्थना करण्यात आली .
यावे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ते असे म्हणाले रोजच्या आयुष्यात खरंतर आपण जर आपल्या मनाची ताकद वाढवली, संयम वाढविला व तर्कशुद्ध विवेकी विचारांची ढाल आपल्याबरोबर बाळगली तर आयुष्यात आलेल्या या छोट्या व मोठ्या संकटांबरोबर आपण न डगमगता लढू शकू असे सांगितले .
मनाची ताकद वाढविणे ही एक सुंदर अनुभूती आहे. यावेळी कोरांना पॉझिटिव्ह पेशंटना संतुलित व निरोगी विकासासाठी येथे राहून नियमित शारीरिक व्यायाम ,योगाभ्यास सकारात्मक विचार या गोष्टी रोजच्या दिनक्रमात करू शकता यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सरते शेवटी जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्व मनांना बळकट मानसिक आरोग्य संपदा, विवेकी विचारांची किनार, भावनिक नियंत्रणाची ताकद व समुद्राएवढी अथांग सहन शक्ती लाभो अशी सदिच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.