शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी चौकुळ शाळेतील विद्यार्थीनीस सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत घेतले दत्तक..

शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी चौकुळ शाळेतील विद्यार्थीनीस सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत घेतले दत्तक..

आतापर्यंत एकूण ७७ विद्यार्थीनींचे पालकत्व

सावंतवाडी /-

आंबोली गावठणवाडी येथील जागतिक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चौकुळ नं. ५ नेने शाळेतील एका विद्यार्थीनीस सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत दत्तक घेतली.

त्यांनी आतापर्यंत एकूण ७७ विद्यार्थीनींचे पालकत्व स्विकारले आहे.आंबोली गावठणवाडी येथील शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा गावडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक गावडे यांच्याकडे ३ हजार रुपये देणगी सुपुर्द केली. यावेळी केंद्रप्रमुख आर. बी गावडे, उपाध्यक्षा साक्षी गावडे, अनंत राऊत, मळववाडी मुख्याध्यापक हसबे उपस्थित होते.
शाळेतर्फे चंद्रकांत सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याउल्लेखनीय कार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी चंद्रकांत सावंत यांनी सन्मानाची शाल,दीपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडीचा गुरू सेवारत्न आदर्श शिक्षक पुरस्कार, भोसले तळीकर प्रतिष्ठान सावंतवाडीचा आदर्श।शिक्षक पुरस्कार व इतर पुरस्कार चौकुळ नेने मुख्याध्यापक कृष्णा गावडे यांच्याजवळ देत आदरयुक्त आपुलकीचा मानसन्मान केला.

अभिप्राय द्या..