▪️देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांची पत्रकार परिषदेत माहिती..

✍🏼लोकसंवाद /- मालवण.

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे.त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात.पण अलिकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात आला आहे.अनेक ठिकाणी धूप होऊन किनारपट्टा विद्रूप होत आहे. वाळू वाहून जात आहे, त्यामुळे बीच नष्ट होत आहेत.या सर्व गोष्टींसाठी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा संगम ते देवबाग संगम या किनारपट्टीत दिनांक २७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सागरी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.आज मालवण शहरातील रामेश्वर हॉटेल येथे देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पत्रकार परिषद झाली. त्यावेळी तांडेल बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत देवबाग सरपंच उल्हास तांडेल ,शिवसेना जिल्हा सचिव किसन मांजरेकर ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर ,कोंकण व्यवसायीक पर्यटन महासंघ अध्यक्ष मंगेश जावकर , समन्वयक बबन शिंदे ,तालुकाप्रमुख राजा गांवकर ,मच्छिमार नेते दिलीप घारे ,शहरप्रमुख बाळू नाटेकर ,डॉ. विलास सावंत ,दिपक सावंत ,मनवेल फर्नांडिस ,जयेश घाडीगांवकर उपस्थित होते.

या यात्रेमध्ये किनारपट्टीच्या नागरिकांशी चर्चा करून प्रत्येक गावच्या समस्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी व किनारपट्टीतील गावे समृद्ध आणि आनंदी होण्यासाठी एक धडक कार्यक्रम महाराष्ट्र सरकार तर्फे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथून या यात्रेला दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा सुरुवात होणार असून दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वा. देवबाग येथे या यात्रेची सांगता होणार आहे.मच्छिमार बांधवांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण या यात्रेत सहभागी व्हावे असे खास निमंत्रण आपणास देण्यात येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page