✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तालुका शिवसेना ( शिंदे गट ) कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली आहे. सदर बैठक कुडाळ येथे पार पडली असून सिंधूदूर्ग जिल्ह्याचे निरीक्षक सन्माननीय राजू फाटक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राजू फाटक यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या.आमच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी कशा प्रकारे पक्ष उभा केला यासंदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.फाटक साहेबांनी त्यांच्या परखड वर्क्तुत्वाने कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकाऱ्यांची मने जिंकून घेतली.कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे जे नैराश्य आलेले त्याला नवसंजीवनी दिली.फाटक साहेबांकडून हीच अपेक्षा होती त्यामुळे आज कार्यकर्त्यांमध्ये संघटना वाढविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले.या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सन्माननीय संजय आग्रे साहेब, महिला जिल्हा प्रमुख श्रीम. वर्षाताई कुडाळकर, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख संदेश सावंत पटेल, तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, महिला तालुकाप्रमुख शिरसाट मॅडम महिला उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर मॅडम व इतर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
