✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी – गुढीपूर येथे स्विफ्ट कारच्या धडकेत सायकल घेऊन रस्ता ओलांडणारा विराज नीलेश तेली (11, सध्या रा पिंगुळी – गुढीपूर, मूळ रा. बोर्डवे – तेलीवाडी, कणकवली) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली. आज सुट्टी असल्याने तो सायकलिंग करण्यासाठी जात असताना काळा त्याच्यावर घाला घातला. महामार्गावरील अनधिकृत मिडलकटचा विराज बळी ठरला.

आज सकाळी विराज सायकल घेऊन पिंगुळी गुढीपूर बस थांबा येथील मिडल कट येथून महामार्ग ओलांडत होता. सावंतवाडी वरून ओरोसच्या दिशेने पोलीस कर्मचारी राजेश वासू गवस (रा. दोडामार्ग ) आपल्या ताब्यातील कार घेऊन जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ड्युटीवर जात होते. त्याच्या भरधाव वेगातील कारची विराजच्या सायकलला जोराची धडक बसली. यात विराज सायकल सह रस्त्यावर फेकला गेला. आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ग्रामस्थांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. विराज हा बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयात पाचवीत शिकत होता. या घटनेने पिंगुळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विराजचे वडील नीलेश तेली जागृती मोटर्स (पिंगुळी – साई मंदिर नजीक ) येथे नोकरीला आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page