✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग.

फुकेरी गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो गाव दुर्गम आणि डोंगराळ आहे. तालुक्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटरवर असलेल्या गावात अनेक असुविधा आहेत. त्यामुळे निदान वीज तरी कायमस्वरूपी असावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाबू आईर, शंभा आईर, जोत्स्ना आईर आदींनी वीज वितरणचे उपअभियंता संतोष नलावडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.फुकेरी गावात १५ दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. शिवाय ट्रान्सफॉर्मरमध्ये वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर बदलून द्यावा व वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य बाबू आईर, शंभा आईर, जोत्स्ना आईर यांनी केली. येत्या चार दिवसांत सर्व समस्यांचे निराकरण करून विद्युत पुरवठा पूर्ववत करू. तसेच ट्रान्सफॉर्मर लवकरच दुरुस्त करून देऊ असे आश्वासन उपअभियंता संतोष नलावडे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page