✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
भक्षाच्या शोधात असताना बिबट्या वाघ कुडाळ तालुक्यातील सरंबळ परबवाडी येथील नंदकुमार परब यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली.परब यांनी याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली.त्यानंतर काही वेळात रेस्क्यू टीम सहित वनपाल अमित कटके, वनपाल अनिल राठोड, वनपाल सावळा कांबळे, वनपाल महेश पाटील, डीसीए रेड्डी, लाड घटनास्थळी दाखल झाले. या टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्याद्वारे सुखरूप बाहेर काढले. सदर बिबट्या पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला होता.सकाळी नंदकुमार परब हे विहिरीकडे गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले.बिबट्या रेस्क्यू मोहिमेत सरंबळ सरपंच रावजी कदम, सागर परब, पोलीस पाटील दिलीप वराडकर आणि सरंबळ गामस्थ यांचे सहकार्य लाभले.
