✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

वेतोरे भिवजीवाडी च्या शालेय परिसरात रस्त्यावरील पाणी व घाण साचत असल्याने व शाळेसमोरील रस्त्याला गटार नसल्याने सर्व दूषित पाणी शाळा परिसरात वाहून येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.याबाबत त्वरित लक्ष पुरवावे,अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालकरवाडी सरपंच व ग्रामस्थ यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम उपअभियंता शशांक भगत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत पाठपुरावा करून सुद्धा गेली चार वर्षे कार्यवाही झालेली नाही. संबंधित समस्येकडे त्वरित लक्ष पुरविण्यात यावे व गटाराची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पालकरवाडी ग्रामपंचायत सरपंच बंड्या पाटील, पालक संघटना अध्यक्ष भालचंद्र चिचकर, कृष्णा खवणेकर, वैभव धुरी, प्रशांत तळकर, श्रीकांत राऊळ, आबा नाईक, भास्कर गाडगीळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत उपाययोजना करण्याबाबत पाहणी करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page