✍🏼लोकसंवाद /- संजय भाईप, सावंतवाडी.

मन ही एक अदभुत शक्ती या कार्यशाळेत 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या कार्यशाळेत स्वःता सद्गुरु गावडे काका महाराज तसेच तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतात. या कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी उत्क्रुष्ट यश संपादन करतात.गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन उत्क्रुष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.वेदांत भाईप यांने या कार्यशाळेत सहभाग घेऊन उत्क्रुष्ट यश संपादन करून आता तो सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे येथे आयटी इंजिनिअरिंगला दुसर्या वर्षाला शिक्षण घेत आहे.त्याने उत्क्रुष्ट यश संपादन केल्याने गुरुपौर्णिमेला श्री. श्री. श्री.108 महंत मठाधीश सद्गुरु प.पू.गावडे काका महाराजांच्या हस्ते सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page