✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
उद्या बुधवार दिनांक ५ जुलै २०२३ रोजी नेरूर मित्र मंडळ नेरूर आयोजित महान पौराणिक नाविन्यपूर्ण संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. अजमेध यज्ञ या नाट्यप्रयोगाची कथा संकल्पना श्री. पप्पू नांदोस्कर यांनी केली आहे. या नाट्यप्रयोगासाठी कलाकार म्हणून गणपती – प्रतीक कलींगन , रिधी सिधी – बंड्या पवार, इंद्र – महेंद्र कुडव, केशी – सुहास मालकर, विष्णु – नारायण आशयेकर , ब्रह्मदेव – यशवंत तेंडुलकर, शंकर – प्रशांत मयेकर , नारद – दत्तप्रसाद शेणई, भुगु ऋषी – अनिल घावनलकर, स्कंध – गौरव शिर्के, यज्ञपक्षु – मोरेश्वर सावंत, देवसेना – सुधीर तांडेल. तसेच संगीत साथ : हार्मोनियम – आशिष तवटे , पखवाज – मंदार सावंत, तालरक्षक – राजू कलिंग न. विशेष सहाय्य : लोकराजा श्री. सुधीर कलिंग न प्रस्तुत श्री. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर… स्थळ : सुखकर्ता हॉल नेरूर चव्हाटा … तरी या संयुक्त दशावतारास सर्व नाट्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन, नेरूर मित्र मंडळ नेरूर यांनी केले आहे.
