✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळमधील सर्व मनसे आजी माजी पदाधिकारी, पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची तातडीची बैठक बुधवार दि. ५ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या बैठकीचे • आयोजन करण्यात आल्याचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या बैठकीला मनसेचे राज्य सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप दळवी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page