☑️ ✍🏼लोकसंवाद न्युज अपडेट्स.
▪️ येत्या 72 तासात मुंबईत मान्सून सक्रिय होणार, 29 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार; भारतीय हवामान खात्याची माहिती.
▪️ पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी आता वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.
▪️ गायीच्या दुधाला किमान 35 रुपये भाव द्यावा आणि दुध भेसळ रोखावी; दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खाजगी व सहकारी दुध संस्थाना निर्देश.
▪️ कांदा कोणीही खरेदी केल्यास अडचण नाही, फक्त शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा; BRS च्या कांदा खरेदीवर भुजबळांची प्रतिक्रिया.
▪️ मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, बळीराजा सुखावला; अद्याप काही ठिकाणी प्रतिक्षा कायम.
▪️ परिवार वाचवण्यासाठी पाटण्यात विरोधकांची बैठक, याचा परिणाम होणार नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका.
▪️ कोविड सेंटर घोटाळा प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स.
▪️ मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन; मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट, तर उद्या अंधेरी, कुर्ल्यात स्फोट घडवण्याची धमकी.
▪️ इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं.
▪️ वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा आऊट, तर वनडे संघात मोठे फेरबदल.
