▪️शिक्षणमंत्री केसरकर यांना निवेदन देत आदेश रद्द करण्याची केली मागणी..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सोसायटीचे कर्ज पुर्ण भरणा केल्यानंतरच कर्ज नुतनीकरण करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामात शेती, बागायती, खते, बी-बीयाणे, औजारे व इतर शेती साधने खरेदी करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. या अनुषंगाने एका लेखी निवेदनाव्दारे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आहे.दरम्यान तातडीने दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांना लेखी पत्र देवून सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देवून विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती केली आहे.या निवेदनांवर करण्यात आली आहे.
