✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राम्हण समाज सेवा मंडळ कणकवलीच्यावतीने तालुक्यातील कुडाळदेशकर गौड ब्राम्हण ज्ञातीतील २०२२ / २३ या शैक्षणिक वर्षातील गुणवंतांचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार ९ जुलै २०१३ रोजी दु. ३ बा. संस्थेच्या फोंडाघाट येथील ‘पूर्णानंद भवन’ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर गुणगौरव कार्यक्रमात सन २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेत ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण आणि सर्व स्पर्धात्मक एन.टी.एस., एम. टी. एम. डी. डी. एस. ऑलिम्पीयाड इ. परीक्षेत कणकवली तालुक्यात १ ते ३ क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रामध्ये व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत पाचवी व आठवी इयत्तेत २१० गुण व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य संपादित केलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे. तसेच सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरस्कार प्राप्त ज्ञातीबांधवांचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.. व सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व ज्ञातीबांधव यांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

तालुक्यातील ज्ञातीतील अशा गुणवंतांनी आपल्या गुणपत्रिकांच्या छायांकित प्रती ५ जुलै २०२३ पर्यंत संस्था पदाधिकाऱ्यांकडे द्यावयाच्या आहेत. सोबत आपला संपूर्ण दुरध्या भ्रमणध्वनी क्रमांक देणेत यावा असे संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी हर्षल गवाणकर, आप्पासाहेब पटवर्धन चौक, रामचंद्र बांवकर पोस्ट ऑफिसनजिक, राजेश आजगांवकर, एस. टी. स्टँड नजिक ९४२१२६६४६४., अरुण सामंत, फोंडाघाट, बिजलीनगर, प्रथमेश महाजन फोंडाघाट यांच्याकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page