✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेविका अक्षता खटावकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी खटावकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी उपस्थित काँग्रेस-शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी खटावकर यांना शुभेच्छा दिल्या.कुडाळ नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू,अधिक्षक सौ. गितांजली नाईक उपस्थित होते.

कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे घटक पक्ष काँग्रेस पक्षाच्या आफ्रिन करोल यांनी दि.१४ मे रोजी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका सौ.अक्षता खटावकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडुन दि.१२ जून रोजी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधी पक्ष भाजपाने मात्र या निवडणुकीत कोणतीच हालचाल केली नाही.दरम्यान आज निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी खटावकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने नगराध्यक्ष पदासाठी सौ.अक्षता खटावकर यांची निवड जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page