✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.कुडाळ तहसीलदार कार्यालयावर टाळ,मृदुंगाच्या गजरात, शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधाचे फलक व भगवे झेंडे हाती घेत हा मोर्चा काढण्यात आला, यावेळी महविकास आघाडी च्या वतीने तहसीलदारांना दोषींवर कारवाई करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्ञानोबा माऊलींची भजने म्हणत काढलेल्या या मोर्चा वेळी शिंदे- फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार म्हणून मिरवणाऱ्या या सरकारने वारकऱ्यांवर लाठीचार्च करुन गतवर्षी सत्तासंघर्षात उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले असताना देखील ठाकरेंनीच विठ्ठलाची पुजा करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,कृष्णा धुरी,बाळा कोरगावकर,संतोष शिरसाट,उदय मांजरेकर, सुशील चिंदरकर, योगेश धुरी,तालुका प्रमुख स्नेहा दळवी,श्रेया गवंडे,अक्षता खटावकर, दीपक आंगणे,सचिन काळप, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, गंगाराम सडवेलकर,काका गावडे,बाळू पालव, दिनेश वारंग,बाळा पावसकर,अमित राणे,राजा पवार,गुरु गडकर,तुळशीदास पिंगुळकर,विनय गावडे,मंजू फडके, काका गावडे,अजित मार्गी,महेश वेळकर, गुंडू कुंभार, प्रकाश सावंत,नामदेव मेजारी,राघोजी झोरे, सुरेश सावंत,सूर्यकांत कदम,चंद्रकांत सावंत, प्रकाश कदम,संजय तावडे, पुनाजी पवार,प्रकाश चव्हाण, बाबल नांदोस्कर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.