✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
वीज पुरवठा सुरळीत नाही, पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही, अश्या प्रकारे कणकवली तालुक्यातील कलमठ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. गेले तीन दिवस रात्री ११ वाजता लाईट जाते ती सकाळी येते. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आज कलमठ वीज कार्यालयाच्या दरवाजाला टाळे ठोकले.
कलमठ गावात एक वायरमन जखमी असल्याने पुरा गाव एका वायरमन वर अवलंबून आहे. वीज कमी दाबाने पुरवठा दळवी कॉलनी, बिडयेवाडी येथे अनेक महिने होवूनही दुर्लक्ष केला जात आहे. पाऊस आला तरी झाडांची कटिंग नाही. कनिष्ठ अभियंता श्री. राणे फोन उचलत नाहीत, ग्राहकांना चांगली सेवा देत नाहीत. गावातील वीज प्रश्न गंभीर असताना त्याकडे वीज वितरण अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सरपंच संदीप मेस्त्री केला.यावेळी माजी सरपंच महेश लाड, पपू यादव, नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, आबा कोरगावकर, बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर, तेजस लोकरे, वैभव चिंदरकर, निखिल कुडाळकर, सत्येंद्र जाधव, सचिन वाघेश्री, प्रसाद काकडे, आबा कोरगावकर, रोहित चिंदरकर, नाना गोठणकर, विजू धुत्रे, बंडू दंताळ आधीच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.