▪️भाजप युवा नेत्याच्या कामाची “त्या” बड्या नेत्यांनी घेतली धास्ती?

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या एका युवा नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे कुडाळात लावलेले बॅनर भाजपा नेत्याच्या आदेशाने हटविल्याची चर्चा रंगू लागली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा भाजपाच्या युवा नेत्याने जिल्ह्यात मागील दोन वर्षात मोठमोठे कार्यक्रम घेऊन आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. राणेंच्या जनाशीर्वाद यात्रेत मुंबई ते दोडामार्ग असे हजारो बॅनर लावून धमाका उडवून दिला होता. यानंतर हा युवा नेता प्रकाश झोतात आला होता. त्याची होणारी प्रसिद्धी आणि लोकप्रियता पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अधिराज्य गाजवू इच्छिणाऱ्या एका भाजपच्या राज्यस्थरावरील नेत्याच्या पोटात पोटशूळ उठल्याने हे बॅनर काढले गेल्याचे त्यांच्याच समर्थक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. हा भाजपाचा नेता कोणालाच जुमानत नसून स्वतः म्हणजेच पक्ष असा अविर्भावाने वागत असून जिल्ह्यातील होतकरू व विकास कामांबाबत धडपडणाऱ्या युवकांना मागे खेचण्याचे काम करत असल्याने या नेत्याबाबत जिल्ह्यातील युवकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे देखील चिन्ह आहे. तसेच बॅनरबाजीमुळे ह्या युवकाची होणारी प्रसिद्धी व लोकप्रियता याचा धसका सदर नेत्याने घेतला असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page