✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी – आंबोली मार्गावर दाणोली येथे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने सुमारे एक तास वाहतुक ठप्प झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना कल्पना देवून सुध्दा कोणीच त्या ठिकाणी आले नसल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेपासून काही अंतरावर घडला आहे.
