✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
भारतीय जनता पक्ष हूमरस व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित केलेल्या हुमरस महोत्सवाचा शानदार समारोप माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या शेवटच्या दिवशी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना हुमरस सारख्या एका कमी लोकवस्तीच्या गावामध्ये आपण गेले सहा दिवस हा हूमरस महोत्सव यशस्वी करून दाखवला त्याबद्दल आपले आभार यापुढेही हा महोत्सव शंभर वर्ष सतत चालू ठेवा व आपल्याला बोलवा मी प्रत्येक वर्षी या महोत्सवाला येईल अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली विकास कामांच्या बाबतीत आपण मला वारंवार जे काम हव असेल ते सांगा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण ते काम पूर्ण करू असे सांगितले.
नुकतेच आपण केलेल्या मागणीनुसार आकेरी ते हूमरस हा एक किलोमीटर चा रस्ता मंजूर केला असून आपल्याला आवश्यक असणारे एक फुलही मंजूर करण्यात आले आहे यावेळी ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्या आभार मानत त्यांचा सत्कारही केला यापुढेही आपण जी मागणी कराल ते आपल्या भाजप पक्षाच्या माध्यमातून आपण पूर्ण करू अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.
व्यासपीठावर माननीय निलेश राणे विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब आनंद शिरवलकर रुपेश कानडे सरपंच सिताराम तेली उपसरपंच प्रवीण वारण पंचायत समिती सदस्या स्वप्ना वारंग, सोनू मेस्त्री, निलेश तेली, गणेश कांबली, नाथा परब, बाबू परब, दाजी वारंग, उंब्रज गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
