लोकसंवाद /- कणकवली.

कलमठ तरंदळे फाटा येथे एसटी बस थांबा अधिकृत असताना देखील एसटी बस थांबविण्यात येत नाही त्यामुळे नोकरदार वर्ग विद्यार्थी वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच लगतच्या गावातील नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे त्यामुळे एसटी बस थांबविण्यात येण्याकरिता राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.आणि असे सांगण्यात आले की बस न थांबवल्यास अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कणकवलीच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे युवक कणकवली तालुका अध्यक्ष नयन गावडे, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर,युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर, युवक जिल्हा सरचिटणीस सागर वारंग, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कृषी सेल तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक, कलमठ विभागीय अध्यक्ष शंकर चिंदरकर, श्री कदम इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page