मालवण /-
मालवण शहरामध्ये सध्या स्थितीत,अलिकडच्या काळात मालवण पोस्ट ऑफीस आणि बैंक ऑफ इंडिया अशा दोन ठिकाणी आधार केंद्र सुरू होती व त्याठिकाणी लोकांच्या नवीन आधारकार्डची नोंदणी आणि जुनी आधारकार्ड अध्यावत करण्याचे काम केले जात होते. परंतु गेले २ महिने पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्र त्या कार्यालयाने बंद केले आहे.आणि बैंक ऑफ इंडिया मालवण शाखेतील आधार कद्ही सध्या बंद झाले आहे. त्यामुळे आधारकार्ड काढणा-या आणि त्यात बदल करू इच्छिणाऱ्या लोकांची फारच गैरसोय होत आहे.
आधारकार्डच्या कामासाठी येणाऱ्या ग्राहकांची खरोखरच त्या ठिकाणी गैरसोय होते को नाही?तसेच येणारे ग्राहक हे भरपूर असल्याकारणाने तेथे सोशल डिस्ट्रसिंग पाळले जात नाही. याचा विचार करता आपण मालवण शहरातील नागरिक व इतरत्र गावातील नागरिक यांना आधारकार्डच्या कामासाठी सोयीस्कर ठिकाणी नव्याने आधारकार्ड केंद्रासाठी परवानगी दयावी, जेणेकरुन येणाऱ्या ग्राहकांना आपली कामे,वेळेवर पूर्ण करता येतील व सदर ग्राहकांना चांगली सेवा देखील देता येईल. प्रत्येक कामासाठी ग्राहकांना आधार कार्डची गरज भासते याचा विचार करता आधारकार्ड संबंधीची कामे वाढत जाणारी आहेत,केंद्र सुरु करण्यास परवानगी दयावी.
शासनाने सध्या अनेक योजना सुरू केल्या आहेत.या सर्वांसाठी आधारकाई ही आता सर्वच ठिकाणी आवश्यक बाब असल्याने आधारकार्डविना लोकांचे फारच हाल होत आहेत.अनेकांनी आधारकार्ड काढताना मोबाईल नंबर लिंक केलेला नव्हता आता मोबाईल नंबर लिक असणे आवश्यक केले आहे.त्यासाठीं देखील लोक आधार केंद्राच्या शोधात असतात.आणि काही लोकांनी याची कैफियत शिल्पा खोत यांच्याकडे मांडली,याचीच दखल घेऊन आज समाजसेविका सौ.शिल्पा यतीन खोत यांनी मालवण तहसीलदार श्री.अजय पाटणे यांना निवेदन देत,याकडे लक्ष वेधले आहे.त्याच बरोबर सौ.शिल्पा खोत यांनी सदरची प्रत, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी, आमदार वैभव नाईक,पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत यांना पण दिली आहे.जेणेकरुन लवकरात लवकर हे नवीन आधार केंद्र सुरू व्हावे आणि लोकांची गैरसोय होऊ नये ,तालुक्यासाठी तात्काळ किमान एकतरी आधार केंद्र सुरु करावे आणि लोकांना दिलासा द्यावा.याच हेतूने तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी यांचे निवेदनाद्वारे सौ.शिल्पा खोत यांनी लक्ष वेधले आहे.यावेळी नगरसेविका सौ.शेजल परब,कुमारी दिया पवार,दीपेश पवार,सौ.साक्षी मयेकर ,सौ.प्रतिभा चव्हाण या उपस्थित होत्या.